God
God चा उल्लेख असलेली वचने
“महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.”
परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.
मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.
तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”
योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.”
हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.)
मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.”
यामुळे त्या लोकांना याहवेहची भीती वाटली आणि त्यांनी याहवेहला यज्ञ केला आणि नवस केला.
याहवेहने एक मोठा मासा नेमला ज्याने योनाहला गिळंकृत केले आणि योनाह त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.
मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.
तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली.
तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.
मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून दूर करण्यात आले आहे; तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे दृष्टी लावेन.’
मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.
“जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.
परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”
मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
मग याहवेहचे वचन दुसऱ्या वेळेस योनाहकडे आले:
“ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.”
तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते.
तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.
पण मनुष्याने आणि प्राण्याने गोणपाट घालावे. प्रत्येकाने त्वरित परमेश्वराचा धावा केला करावा आणि आपली वाईट कृत्ये आणि हिंसाचार सोडावा.
कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”
जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.
त्याने याहवेहकडे प्रार्थना केली, “हे याहवेह, जेव्हा मी आपल्या देशात होतो, तेव्हा मी हे म्हटले नाही काय? म्हणून मी तार्शीशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होते की तुम्ही कृपाळू आणि दयाळू परमेश्वर आहात, मंदक्रोध आणि विपुल प्रीती करणारे आहात, विपत्ती आणल्याबद्दल अनुताप करणारे परमेश्वर आहात.