God
God चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.”
परंतु याहवेहनी उत्तर दिले, “तुला राग येणे योग्य आहे का?”
मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला.
पण दुसर्या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले.
जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.”
तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.”
परंतु याहवेह म्हणाले, “तू या रोपट्यासाठी चिंतित आहेस, ज्याची काळजी तू घेतली नाहीस किंवा वाढविले नाहीस. ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली.
यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.
सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका, पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या, सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून, तुमच्याविरुद्ध साक्ष देतील.
पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.
त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.
“म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन.
तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”
कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; ती यहूदीयामध्ये पसरली आहे. ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.
मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.
मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.
म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.
त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”
म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.
हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?
अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.
तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.
जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!
“हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चित गोळा करेन; इस्राएलच्या उरलेल्यांना मी खचित गोळा करेन. जसे मेंढवाड्यात मेंढरे, जसे कुरणात कळप, तसे मी त्यांना एकत्र गोळा करेन; आणि ती जागा लोकांनी फुलून जाईल.
जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, याहवेह त्यांचे पुढारी असतील.”