God
God चा उल्लेख असलेली वचने
जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन.
ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”
याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.
“हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.
“हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या.
मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.
माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”
मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का?
एक हजार मेंढे किंवा जैतून तेलाच्या दहा हजार नद्यांनी याहवेह संतुष्ट होतील काय? माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझा ज्येष्ठपुत्र अर्पावा काय, माझ्या आत्म्याच्या पापासाठी माझ्या शरीराचे फळ द्यावे काय?
हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे. आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात? नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे.
ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका.
चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय?
म्हणून तुमच्या पातकांमुळे तुमचा नायनाट व नाश करण्यास मी सुरुवात केली आहे.
तू खाशील तृप्त होणार नाही; खाल्ल्यानंतरही तुझे पोट रिकामे राहील. तू साठवून ठेवशील, पण काहीही उरणार नाही, कारण मी तुझी बचत तलवारीला देईन.
तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”
मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.
अरे माझ्या वैर्या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील.
मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.
मग माझे शत्रू हे पाहून ते लज्जेने झाकले जातील, ती जी मला म्हणत होती, “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” माझे डोळे तिचे पतन पाहतील; रस्त्याच्या चिखलाप्रमाणे तीही पायाखाली तुडविली जाईल.
आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, जो तुझ्या वतनाचा कळप आहे, जो एकटाच जंगलात, सुपीक कुरणात राहतो. त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात यथेच्छ चरू द्या.
“तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.”
ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.
तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.
पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल.
फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.