मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत; याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत. त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.

  2. याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत; याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात. ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.

  3. त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.

  4. संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल? त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल? त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो; त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.

  5. याहवेह चांगले आहेत, संकटसमयी आश्रयस्थान आहेत. त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.

  6. परंतु भयंकर महापुराने ते निनवेहचा अंत करतील; त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.

  7. याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात त्याचा ते अंत करतील; ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.

  8. हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे जो याहवेहविरुद्ध कट रचेल आणि दुष्ट योजना करू शकेल?

  9. याहवेह असे म्हणतात: “यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत, तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल. हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले, तरी आता मी तुला पीडा देणार नाही.

  10. आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”

  11. हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.”

  12. जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी, इस्राएलच्या वैभवासारखे याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.

  13. सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात: “मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे, मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन, आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल. मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही. तुझ्या संदेशवाहकांचे आवाज यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.”

  14. सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे, मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन. तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन.

  15. मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन, मी तुला अपमानित करेन आणि तुला तमाशा बनवेन.

  16. तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”

  17. हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.

  18. तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

  19. मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.

  20. हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.

  21. तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?

  22. मी पहारा देण्यासाठी उभा राहीन आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन; मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.

  23. तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.

  24. लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?

  25. कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.