मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;

  2. त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन आणि जे बेफिकीर असतात, जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.

  3. याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.

  4. “मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्‍या एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील, कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.

  5. त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी त्यांना याहवेहच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही.” त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल, कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.

  6. फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.

  7. या देशातील नम्रजन हो, याहवेहचा ध्यास करा, तुम्ही जे त्यांच्या आज्ञा पाळता. धार्मिकतेचा ध्यास करा, नम्रतेचा ध्यास करा; याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी कदाचित तुम्हाला आश्रयस्थान मिळेल.

  8. हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”

  9. ती भूमी यहूदीयाच्या वंशातील अवशेषाचे वतन होईल; तिथे त्यांची कुरणे असतील. संध्याकाळी ते अष्कलोन येथील घरात विश्रांती घेतील. याहवेह, त्यांचे परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतील; त्यांचे पूर्वीचे वैभव त्यांना परत प्राप्त करून देतील.

  10. “मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, जे माझ्या लोकांचा उपहास करतात आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.

  11. म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”

  12. त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.

  13. जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.

  14. “अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”

  15. ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.

  16. कळप व मेंढरे सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे तिच्या स्तंभावर निवारा घेतील. घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.

  17. ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.

  18. परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; ते काहीही अयोग्य करीत नाहीत. प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.

  19. “मी अनेक राष्ट्रांचा नाश केला; त्यांच्या गडांना उद्ध्वस्त केले आहे. मी त्यांचे रस्ते ओसाड केले आहेत तिथून कोणीही प्रवास करीत नाही. आणि त्यांची शहरे निर्जन केली आहेत; ते त्यागलेले व रिकामे झाले आहेत.

  20. यरुशलेमबद्दल मी विचार केला, ‘निश्चितच तू माझे भय धरशील; आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ तेव्हा तिचे आश्रयस्थान उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, पण तरीही पूर्वीसारखीच भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”

  21. याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा, त्या दिवशी मी दोषारोप करण्यास उभा राहीन. पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन; माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण विश्व जळून भस्म होईल.

  22. “मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन, असे की ते सर्व याहवेहच्या नामाचा धावा करतील आणि खांद्याला खांदा लावून त्यांची सेवा करतील.

  23. कूश देशाच्या नद्यांपलीकडून माझे उपासक, माझे विखुरलेले लोक माझ्यासाठी अर्पणे आणतील.

  24. त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही गर्विष्ठपणा केला जाणार नाही.

  25. मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, असेच अवशिष्ट लोक ठेवेन. इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते याहवेहच्या नामात आश्रय घेतील.