मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.

  2. परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.

  3. हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.

  4. परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.

  5. त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते; किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती, जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते.

  6. महामारी त्यांच्या पुढे चालते; घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.

  7. ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले; त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला. पुरातन पर्वतांचा चुराडा झाला प्राचीन डोंगर ढासळले— परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत.

  8. हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय? झऱ्यांविरुद्ध तुमचा कोप होता काय? जेव्हा जय मिळविण्यासाठी तुम्ही अश्वारूढ झालात व तुमच्या रथात स्वार झालात, तेव्हा तुम्ही समुद्राविरुद्ध क्रोधित झाला होता काय?

  9. तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले, व अनेक बाण मागविले. सेला नद्यांनी भूमी विभागली;

  10. पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले. पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला; खोल समुद्र गरजला आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या.

  11. तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.

  12. क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले.

  13. तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला

  14. तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले.

  15. तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.

  16. सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील. गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.

  17. सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्‍याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:

  18. “मी पृथ्वीतलावरून सर्वकाही झटकून नाहीसे करेन.” असे याहवेह जाहीर करतात.

  19. “मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन; मी आकाशातील पक्षी नष्ट करेन आणि समुद्रातील मासेही— त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा मी पृथ्वीवरून सर्व मानवजातीला नष्ट करेन,

  20. तेव्हा मी यहूदीयातील आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन. या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्‍यांच्या नावाचा—

  21. जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात. जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात, आणि मोलेख दैवताचीही शपथ घेतात,

  22. जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”

  23. सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा. कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे; याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे; ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.

  24. याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी मी अधिपतींना आणि राजपुत्रांना आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्‍या सर्वांना शिक्षा करेन.

  25. त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात जे त्यांच्या दैवतांची मंदिरे हिंसाचार व लबाडीने भरतात.