God
God चा उल्लेख असलेली वचने
परंतु त्यांना हे कळत नाही की त्यांची सर्व वाईट कृत्ये मला स्मरण आहेत. त्यांच्या पापकर्मांनी त्यांना घेरले आहे; ते नेहमी माझ्यासमोर असतात.
ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.
इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात, हे सर्व असूनही तो याहवेह त्याच्या परमेश्वराकडे वळत नाही, किंवा त्यांचा शोध घेत नाही.
जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन; मी त्यांना आकाशातील पक्ष्याप्रमाणे खाली आणेन. जेव्हा मी ऐकेन की ते एकत्र होत आहेत, तेव्हा मी त्यांना पकडेन.
ते माझ्यापासून बहकले आहेत म्हणून त्यांचा धिक्कार असो! त्यांचा नाश होवो, कारण त्यांनी माझ्याविरुद्ध विद्रोह केला आहे. मला त्यांचा उद्धार करावयाची इच्छा होती, पण ते माझ्याबद्दल खोटे बोलतात.
ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात, पण ते माझ्यापासून दूर राहतात.
मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे, परंतु ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.
ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत; तर ते सदोष धनुष्यांसारखे आहेत. उर्मट शब्दांमुळे त्यांचे पुढारी तलवारीला बळी पडतील. यामुळे इजिप्त देशात त्यांची थट्टा करण्यात येईल.
“तू कर्णे आपल्या मुखाला लाव! याहवेहच्या भवनावर एक गरुड आहे, कारण लोकांनी माझा करार मोडला आहे आणि माझ्या नियमशास्त्राविरुद्ध बंड केले आहे.
इस्राएल माझा धावा करून आता म्हणतो, ‘आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचा स्वीकार करतो!’
त्यांनी माझ्या संमतीशिवाय राजे नेमले आहेत; ते माझ्या मान्येतेशिवाय अधिपतींना निवडतात. त्यांनी आपले चांदी आणि सोने घेऊन स्वतःच्या नाशाकरिता मूर्ती बनविल्या आहेत.
हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?
ते इस्राएलाकडून आहे! हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; तो परमेश्वर नाही. शोमरोनाच्या या वासराचे तुकडे तुकडे करण्यात येतील.
जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल, तरीही आता मी त्यांना एकत्र करेन. बलाढ्य राजाच्या अत्याचाराने ते नष्ट होऊ लागतील.
मी त्यांच्यासाठी माझ्या नियमशास्त्राच्या पुष्कळ गोष्टी लिहिल्या, पण त्यांनी ते परकीय मानले.
जरी ते त्यांचे यज्ञार्पण मला भेटस्वरूप अर्पितात, आणि तरीही ते मांस खातात, याहवेह त्यांच्याशी प्रसन्न नाही. आता ते त्यांचा दुष्टपणा स्मरणार आणि त्यांच्या पापांची शिक्षा देणार: ते इजिप्तला परततील.
कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे आणि राजवाडे बांधले; यहूदाहने अनेक तटबंदीची नगरे बांधली आहेत. पण मी त्यांच्या नगरांवर अग्नी पाठवून त्यांचे किल्ले भस्म करेन.”
हे इस्राएला, आनंद करू नकोस; इतर राष्ट्रांसारखे उल्लासू नकोस, कारण तू तुझ्या परमेश्वराशी अविश्वासू झाला आहेस; धान्याच्या प्रत्येक खळ्यावर वेश्याव्यवसाय करून मिळणारी कमाई तुला आवडते.
याहवेहच्या देशात ते राहणार नाहीत; एफ्राईम इजिप्त देशात परत जाईल आणि अश्शूर येथे अशुद्ध भोजन खाईल.
ते याहवेहला द्राक्षारसाची पेयार्पणे करू शकणार नाही, किंवा त्यांच्या यज्ञार्पणाने याहवेहला संतोष होणार नाही. कारण असे यज्ञ त्यांच्यासाठी शोक करणाऱ्यांच्या अन्नासारखे होईल; त्यास खाणारे सर्वजण अमंगळ होतील. ते भोजन त्यांच्यासाठीच असेल; ते याहवेहच्या मंदिरात आणता येणार नाही.
मग तू ठरविलेल्या उत्सवाच्या दिवशी, याहवेहच्या सणाच्या दिवशी काय करशील?
संदेष्टा माझ्या परमेश्वरासोबत, एफ्राईमचा पहारेकरी आहे, तरीही त्याच्या सर्व मार्गात सापळा त्याची वाट पाहत आहे, आणि परमेश्वराच्या भवनात शत्रुत्व आहे.
जसे गिबियाहमधील दिवसात केले तसे त्यांनी स्वतःला अधिक भ्रष्ट केले आहे. परमेश्वर त्यांचे दुष्कर्म स्मरणात ठेवतील आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करतील.
“जेव्हा मला इस्राएल आढळला, तेव्हा ते रानात द्राक्षे आढळल्यासारखे होते; जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना पाहिले, ते अंजिराच्या झाडावर प्रथमफळ पाहण्यासारखे होते. पण जेव्हा ते बआल-पौराला आले तेव्हा त्यांनी त्या घृणास्पद मूर्तींपुढे स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या आवडत्या वस्तूप्रमाणे अमंगळ झाले.
जरी त्यांनी मुलांचे संगोपन केले, तरी मी त्यांना सर्वांपासून दूर करेन. मी त्या लोकांपासून निघून जाईन, तेव्हा त्यांचा धिक्कार असो.