God
God चा उल्लेख असलेली वचने
“ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत; ते व्यभिचार करतील परंतु त्यांची भरभराट होणार नाही, कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला आहे आणि स्वतःस वेश्या व्यवसायास सोपविले आहे.
माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते. व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो; ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत.
“जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात, अथवा तुमच्या सुना त्या व्यभिचार करतात, मी तुमच्या कन्यांना शासन करणार नाही, कारण पुरुष स्वतः वेश्यांबरोबर सहवास करतात आणि पवित्र स्थळी असलेल्या देवदासींबरोबर बलिदान करतात— समंजसपणा नसलेल्या लोकांचा नाश होईल!
“हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस. “गिलगालकडे जाऊ नका; वर बेथ-आवेन येथे जाऊ नका. आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.
जशी कालवड हट्टी असते, तसे इस्राएली लोक हट्टी आहेत. मग जशी कोकरे कुरणात चरतात, त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील?
बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे, मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे; इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही. हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस; इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.
“त्यांची कर्मे त्यांना पुन्हा त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; ते याहवेहला ओळखत नाहीत.
जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन याहवेहच्या शोधात फिरतील, ते त्यांना सापडणार नाही; कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत.
ते याहवेहशी अविश्वासू राहिले; ते अनौरस लेकरांना जन्म देतात. जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील, तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून टाकतील.
एफ्राईम शासनाच्या दिवशी ओसाड पडेल. इस्राएली गोत्रात जे निश्चितच होणार त्याची घोषणा करणार.
यहूदाहचे पुढारी सीमारेषांचे दगड हालविणारे झाले आहेत. एखाद्या जलप्रलयाप्रमाणे मी माझा संताप त्यांच्यावर ओतेन.
एफ्राईमाला मी कसर, आणि यहूदाहसाठी सडीचा रोग आहे.
कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा, व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन. मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन; मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.
ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”
“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील.
ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू.
चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”
“एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते.
म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो.
कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे.
आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.
मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे: एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे, इस्राएल अपवित्र झाला आहे.
“हे यहूदाह, तुझ्यासाठी हंगामाची वेळ नेमलेली आहे. “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन,
जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, तेव्हा एफ्राईमचे पाप आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. ते लबाडी करतात, चोर घरात चोरी करतात, लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;