God
God चा उल्लेख असलेली वचने
परंतु परमेश्वराचा एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “महाराज, इस्राएलकडून आलेल्या या सैन्याने तुमच्याबरोबर जाऊ नये, कारण याहवेह इस्राएलबरोबर नाहीत; एफ्राईमच्या कोणत्याही लोकांबरोबर नाहीत.
जरी तुम्ही जाल आणि धाडसाने युद्ध कराल, तरी परमेश्वर तुम्हाला शत्रूसमोर उलथून पाडतील, कारण कोणाला मदत करावी किंवा कोणाला उलथून पाडावे यासाठी परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत.”
अमस्याहने परमेश्वराच्या मनुष्याला विचारले, “परंतु मी या इस्राएली सैन्यासाठी शंभर तालांत चांदी दिली आहेत त्याचे काय?” परमेश्वराच्या मनुष्याने उत्तर दिले, “याहवेह, तुम्हाला त्याच्यापेक्षाही अधिक देऊ शकतात.”
याहवेहचा राग अमस्याहवर भडकला आणि त्यांनी त्याच्याकडे एका संदेष्ट्याला पाठविले, तो म्हणाला, “या लोकांच्या दैवतांचा तू सल्ला का घेतोस, जे स्वतःच्या लोकांना तुझ्या हातातून वाचवू शकले नाहीत?”
तो बोलत असतानाच राजा त्याला म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार नेमला आहे का? थांब! का बरे तू मारला जावास?” तेव्हा तो संदेष्टा थांबला व म्हणाला, “मला माहीत आहे की परमेश्वराने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू असे केलेस आणि माझा सल्ला ऐकला नाहीस.”
परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता.
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला.
अमस्याह याहवेहचे अनुसरण करण्यापासून दूर गेला, तेव्हापासून त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.
त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
जखर्याहच्या काळात त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला परमेश्वराच्या भयामध्ये राहणे शिकविले. जोपर्यंत त्याने याहवेहचा सल्ला घेतला, परमेश्वराने त्याला यश दिले.
परमेश्वराने त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध आणि गुर-बाल येथे राहणार्या अरब लोकांविरुद्ध आणि मऊनीमी लोकांविरुद्ध लढण्यास मदत केली.
परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.
अजर्याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले.
ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.”
उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला.
जेव्हा अजर्याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.
उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.
त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले.
योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले.
योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.
वयाच्या वीसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे पिता दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.
त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
त्यामुळेच त्याचे परमेश्वर याहवेहनी त्याला अरामच्या राजाच्या हाती सोपविले. अरामी लोकांनी त्याचा पराभव केला आणि त्याच्या अनेक लोकांना कैद करून दिमिष्क येथे आणले. त्याला इस्राएलच्या राजाच्या हातीही सोपविले, ज्याने त्याला भारी हानी पोहोचविली.
रमाल्याह याचा पुत्र पेकहने एका दिवसात यहूदीयामधील एक लाख वीस हजार सैनिकांना ठार केले—कारण यहूदीयाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता.
परंतु ओदेद नावाचा याहवेह यांचा एक संदेष्टा तिथे होता आणि जेव्हा सैन्य शोमरोनकडे परत आले, तेव्हा तो त्यांची भेट घेण्यासाठी निघाला. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यहूदीयावर रागावले होते म्हणून त्यांनी त्यांना तुमच्या हाती दिले. परंतु इतक्या क्रोधाने तुम्ही त्यांची कत्तल केली आहे की, त्याचे पडसाद स्वर्गापर्यंत पोहोचले.