मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि आता तुमचा असा उद्देश आहे की, यहूदीया आणि यरुशलेममधील स्त्री-पुरुषांना तुमचे गुलाम बनवावे. परंतु तुमचे परमेश्वर याहवेह यांच्याविरुद्ध केलेल्या पापाबद्दल तुम्हीदेखील दोषी नाहीत का?

  2. आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.”

  3. ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”

  4. इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला.

  5. आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

  6. त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.

  7. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातील इतर वस्तू एकत्र केल्या आणि कापून त्याचे तुकडे केले. त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे बंद केले आणि यरुशलेममधील प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात वेद्या बसविल्या.

  8. यहूदीयामधील प्रत्येक गावात त्याने इतर दैवतांना बलिदाने अर्पिण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि याहवेहच्या, त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वराच्या रागाला चेतावणी दिली.

  9. त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  10. त्याच्या राज्यकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, त्याने याहवेहच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली.

  11. आणि म्हणाला: “लेवींनो, माझे ऐका! आता तुम्ही स्वतःला पवित्र करा आणि याहवेह तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर यांचे मंदिर पवित्र करा. सर्व अशुद्धता या पवित्रस्थानातून काढून टाका.

  12. आमचे पालक अविश्वासू होते; त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि त्यांचा त्याग केला. त्यांनी याहवेहच्या निवासस्थानापासून त्यांचे मुख फिरविले आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली.

  13. त्यांनी अंगणाचे दरवाजे बंद केले आणि दिवे विझविले. त्यांनी धूप जाळला नाही किंवा त्या पवित्रस्थानात इस्राएलच्या परमेश्वराला कोणतेही होमार्पण दिले नाही.

  14. त्यामुळेच याहवेहचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला आहे; त्यांनी त्यांना भयप्रद व दहशत निर्माण करणारे आणि तिरस्काराचा विषय असे केले आहे, जसे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता.

  15. आता मी या उद्देशाने इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्याशी एक करार करतो की, जेणेकरून त्यांचा भयंकर क्रोध आपल्यापासून दूर होईल.

  16. माझ्या मुलांनो, आता निष्काळजी राहू नका, कारण याहवेहनी तुम्हाला त्यांच्यासमोर उभे राहण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे सेवक होण्यासाठी आणि धूप जाळण्यासाठी निवडले आहे.”

  17. जेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या लेवींना एकत्र जमविले आणि त्यांनी स्वतःला पवित्र केले, तेव्हा ते याहवेहच्या वचनाचे पालन करून, राजाज्ञेनुसार याहवेहच्या मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिरात गेले.

  18. याजक याहवेहच्या पवित्रस्थानात त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आत गेले. त्यांना याहवेहच्या मंदिरात जे काही अशुद्ध सापडले ते सर्व त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या अंगणात आणले. लेव्यांनी ते घेतले आणि किद्रोन खोऱ्याकडे नेऊन फेकले.

  19. पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले.

  20. मग ते हिज्कीयाह राजाकडे गेले आणि त्यांनी अहवाल दिला: “आम्ही याहवेहचे संपूर्ण मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यातील सर्व भांडी आणि पवित्र भाकर ठेवण्यासाठी असलेला मेज, त्याच्या सर्व वस्तू शुद्ध केल्या आहेत.

  21. राजा आहाज राजा असताना त्यांच्या अविश्वासूपणामध्ये त्यांनी काढून टाकलेल्या सर्व वस्तू आम्ही तयार केल्या आहेत आणि पवित्र केल्या आहेत. त्या सर्व वस्तू आता याहवेहच्या वेदीसमोर आहेत.”

  22. दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला.

  23. त्यांनी सात गोर्‍हे, सात मेंढे, सात नरकोकरे आणि सात बोकडे हे राष्ट्राच्या पापार्पणासाठी, पवित्रस्थानासाठी आणि यहूदीयासाठी आणले. राजाने याजकांना, अहरोनाच्या वंशजांना हे सर्व याहवेहच्या वेदीवर अर्पण करण्यास सांगितले.

  24. दावीद राजा, राजाचा संदेष्टा गाद आणि नाथान संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे झांजा, वीणा आणि तंतुवाद्ये घेऊन त्याने लेवींना याहवेहच्या मंदिरात ठेवले; अशी आज्ञा याहवेहनी त्यांच्या संदेष्ट्यांद्वारे दिली होती.

  25. हिज्कीयाहने वेदीवर बलिदानांचे होमार्पण करण्याची आज्ञा दिली. अर्पण सुरू झाले तेव्हाच इस्राएलचा राजा दावीदाची वाद्ये आणि कर्ण्यांसह याहवेहसाठी गीते गाण्यास सुरुवात झाली.