मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.

  2. इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.

  3. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती.

  4. बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.

  5. फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश

  6. दावीदाने व अधिकार्‍यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.

  7. कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्‍यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली.

  8. त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.

  9. त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.

  10. त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.

  11. ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्‍यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले.

  12. दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे परमेश्वराच्या उपासनेत आणि शुद्धीकरणविधीमध्ये गायक व द्वारपाल हे सहकार्य करीत होते.

  13. दावीदाच्या व आसाफाच्या काळापासून संगीतकारांसाठी संचालक नेमण्याची व परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे व उपकारस्तुती गाण्यास सुरुवात झाली होती.

  14. दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला. याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!

  15. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका.

  16. संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या.

  17. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.

  18. बिन्यामीनी कूशच्या बोलण्यावरून याहवेहस गायलेले दावीदाचे शिग्गायोन. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा.

  19. संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.

  20. संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.

  21. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”

  22. संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.

  23. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?

  24. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.

  25. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?