- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
David
David चा उल्लेख असलेली वचने
दावीदाचे मिक्ताम परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
दावीदाची एक प्रार्थना. याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.
संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला, याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.
ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो!
संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र. माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?
दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.
दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा, मी दोषरहित जीवन जगलो; याहवेह, मी न डगमगता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.
दावीदाचे स्तोत्र. अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नका; आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
दावीदाचे स्तोत्र; मासकील धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला. मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.
संगीत दिग्दर्शकासाठी. याहवेहचा सेवक दावीदाचे स्तोत्र. दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.
दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.
दावीदाचे स्तोत्र. एक याचिका. याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका. संतापून मला दंड करू नका.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र. मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.”
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.