- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
David
David चा उल्लेख असलेली वचने
हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?
दावीदाची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
दावीदाची रचना माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.
संगीत दिग्दर्शकाकरिता. दावीदाची रचना. एक स्तोत्र. हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा, तुम्ही मौन धारण करू नका,
दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”
इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.
प्रवाशांचे आराधना गीत. हे याहवेह, दावीदाचे व त्याच्या स्वसुखत्यागाचे स्मरण करा.
तुमचा सेवक दावीदाकरिता तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.
याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की, एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत: “तुझ्या वंशजांपैकी एकाला मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन.
“येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
दावीदाचे स्तोत्र. हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा.
दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.
दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.
दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.
दावीदाचे स्तोत्र. याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो, ते माझ्या बाहूंना युद्धाचे व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.
राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून
एक स्तवनगीत. दावीदाची रचना. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: