मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. जे दुर्बलांची चिंता करतात, ते धन्य; याहवेह त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांना मुक्त करतील.

  2. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा. परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे. हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?

  4. संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.

  5. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. जेव्हा जिफी लोकांनी जाऊन शौलाला कळविले: “दावीद आमच्याजवळ लपला आहे.” परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा; आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.

  6. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करू नका.

  7. संगीत दिग्दर्शकासाठी. “दूरच्या एला वृक्षावर बसलेला कबुतर” या चालीवर आधारित. दावीदाची मिक्ताम गाण्याची रचना. पलिष्ट्यांनी गथ देशात दावीदाला धरले, त्या घटनेचा हा संदर्भ आहे. हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात.

  8. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.

  9. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय?

  10. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.

  11. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.

  13. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.

  14. यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे गार्‍हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.

  16. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.

  17. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो; त्यांचे वैरी त्याच्यापुढून पळून जावोत.

  18. संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.

  19. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका. हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.

  20. इशायाचा पुत्र दावीदच्या प्रार्थना समाप्त झाल्या.

  21. त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.

  22. दावीदाची एक प्रार्थना हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.

  23. तुम्ही म्हणालात, “माझा निवडलेला सेवक, दावीद, याच्याशी मी एक करार केला आहे; मी शपथ वाहिली आहे की,

  24. तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.

  25. सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—