मुख्य मजकुरावर जा

David

968 वचने · 40 कुटुंब सदस्य

David चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’

  2. “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.

  3. पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.

  4. “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.

  5. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.

  6. “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’

  7. तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.

  8. हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका.

  9. याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते.

  10. सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी त्याने लोकांना त्यांच्या घरी रवाना केले, याहवेहने दावीद आणि शलोमोन आणि त्यांच्या इस्राएली लोकांसाठी जी चांगली कृत्ये केली, त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.

  11. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर, तू आपला पिता दावीदाप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील,

  12. तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’

  13. शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”

  14. त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.

  15. नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा वारस रेहोबोअम राजा झाला.

  16. राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “दावीदामध्ये आमचा काय वाटा, इशायच्या मुलाशी आमचा काय भाग, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे सर्व लोक परत घरी गेले.

  17. याप्रकारे इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

  18. त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले.

  19. रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती.

  20. रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र अबीयाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  21. तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे?

  22. तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले.

  23. “आणि आता तुम्ही याहवेहच्या राज्याला, जे दावीदाच्या वंशजांच्या हातात आहे, विरोध करण्याची योजना केली आहे. तुमचे खरोखरच प्रचंड सैन्य आहे आणि तुमच्याकडे यरोबोअमने तुमची दैवते केलेली सोन्याची वासरे आहेत.

  24. मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा त्याचा वारस म्हणून राजा झाला. त्याच्या कारकिर्दीच्या दहा वर्षे राज्यात शांतता होती.

  25. त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.