Skip to content

Widows बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 56 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”

  2. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”

  3. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  4. तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.

  5. राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?” ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे.

  6. तेव्हा ती म्हणाली, “शूनेमकरीण अबीशग हिला तुझा भाऊ अदोनियाह याला पत्नी म्हणून दे.”

  7. शलोमोन राजाने त्याच्या आईला उत्तर दिले, “तू अदोनियाहसाठी शूनेमकरीण अबीशग हिची विनंती का करतेस? तू त्याच्यासाठी राज्य मागू शकतेस; शेवटी तो माझा थोरला भाऊ आहे; होय, त्याच्यासाठी आणि अबीयाथार याजक व जेरुइयाहचा पुत्र योआब यांच्यासाठी देखील मागू शकतेस!”

  8. तेव्हा शलोमोन राजाने याहवेहची शपथ घेतली: “अदोनियाहने ही जी विनंती केली आहे त्यासाठी त्याचा जीव देऊन त्याने किंमत मोजली नाही तर, परमेश्वर माझे पाहो आणि माझ्याशी अधिक कठोरपणे वागो!

  9. तर आता, ज्यांनी मला माझे पिता दावीदाच्या राजासनावर स्थापित केले आहे आणि त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझे घराणे स्थापित केले आहे, ते याहवेह जिवंत आहेत; आज अदोनियाहला जिवे मारले जाईल!”

  10. “सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.”

  11. तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, “एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?”

  12. ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.”

  13. ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”

  14. एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव.

  15. कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ”

  16. ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे.

  17. आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले तसेच अनाथांना बलहीन केलेस.

  18. अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.

  19. पुत्रहीन व वांझ स्त्रीस ते भक्ष करतात, आणि विधवांशी ते दयेने वागत नाहीत.

  20. आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.

  21. मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.

  22. “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,

  23. परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत, ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.

  24. याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही.

  25. ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात;