मुख्य मजकुरावर जा

Widows बद्दल बायबलमधील वचने: Allowed to share in our blessings

6 वचने · 56 पैलू

Allowed to share in our blessings बद्दल वचने

  1. म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  2. याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांनी आपल्या नावासाठी निवडलेल्या पवित्रस्थानी—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी आणि परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  3. आनंदोत्सव साजरा करण्यास—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी, परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  4. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  5. तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.

  6. जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.