मुख्य मजकुरावर जा

Widows बद्दल बायबलमधील वचने: When left childless, to be married by their husband's nearest of kin

11 वचने · 56 पैलू

When left childless, to be married by their husband's nearest of kin बद्दल वचने

  1. भाऊ एकत्र राहत असतील व त्यातील एकजण निपुत्र मरण पावला, तर त्याच्या विधवेने कुटुंबाबाहेर परक्याशी विवाह करू नये. तिच्या पतीच्या भावाने तिच्याशी विवाह करावा आणि तिचा स्वीकार करावा आणि तिच्याप्रती दिराचे कर्तव्य पूर्ण करावे.

  2. तिला जन्मलेल्या पहिल्या पुत्राला मृत भावाचे नाव द्यावे, जेणेकरून त्याचे नाव इस्राएलमधून पुसले जाणार नाही.

  3. “माझ्या मुली, याहवेह तुला आशीर्वाद देवो,” त्याने उत्तर दिले. “जो दयाळूपणा तू आता दाखविला, तो पूर्वी दाखविला त्यापेक्षा अधिक आहे: गरीब असो वा श्रीमंत, पण तू अशा तरुण पुरुषांच्या मागे गेली नाहीस.

  4. आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस.

  5. ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे.

  6. आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”

  7. मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”

  8. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  9. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  10. आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली.

  11. पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली.