Skip to content

Widows बद्दल बायबलमधील वचने

90 वचने · 56 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.

  2. गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.

  3. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.

  4. तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.

  5. त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात— जुलूम करणारा हुकूमनामा जे काढतात,

  6. गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.

  7. “अगे चैनबाजीचे वेड असणारी, सुरक्षितपणे विलासणारी, आणि स्वतःला म्हणणारी, ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. मी कधीही विधवा होणार नाही माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’

  8. पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. येथे तुझे अनेक चेटके आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.

  9. “भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही. अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही. तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.

  10. जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,

  11. मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,

  12. म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.

  13. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  14. ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन. आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ”

  15. एकेकाळी माणसांनी गजबजलेली ही नगरी, आता कशी निर्जन झाली आहे! एकेकाळी राष्ट्रांमध्ये जी सर्वोत्कृष्ट नगरी होती, तिला आता कसे वैधव्यच प्राप्त झाले आहे! एकेकाळची ही सर्व प्रांताची राणी आता कशी दासी झाली आहे.

  16. आम्ही पितृहीन झालो आहोत, आमच्या माता विधवा झाल्या आहेत.

  17. तुझ्यातील आईवडिलांना त्यांनी तुच्छ मानले; त्यांनी तुझ्यातील विदेशीयांवर अत्याचार केला आणि अनाथ व विधवांना अयोग्य वागणूक दिली.

  18. विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’

  19. “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  20. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  21. आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली.

  22. पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली.

  23. जे देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.

  24. मग एक गरीब विधवा आली आणि या गरीब विधवेला तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना त्यांनी पाहिले, ज्याची किंमत फक्त एक पैसा होती.

  25. ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे.