Skip to content

Wells बद्दल बायबलमधील वचने

53 वचने · 43 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोकांनी उत्तर दिले: “आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.”

  2. तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

  3. मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा,

  4. जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले,

  5. तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल,

  6. परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले.

  7. दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!”

  8. तुम्ही त्यांची सर्वोत्तम शहरे, तसेच तटबंदी असलेली शहरेही जिंकून घ्याल. प्रत्येक उत्तम झाड तुम्ही कापाल, सर्व झर्‍यांचे पाणी तुम्ही अडवाल आणि दगड पसरून त्यांच्या सुपीक जमिनीची नासाडीही कराल.”

  9. त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला.

  10. दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”

  11. तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.

  12. त्याने वाळवंटात बुरूजही बांधले आणि पुष्कळ पाण्याच्या टाक्या बांधल्या, कारण त्याच्याकडे डोंगरपायथ्याजवळ आणि मैदानात भरपूर गुरे होती. त्याच्या शेतामध्ये आणि डोंगरामधील द्राक्षमळ्यात आणि उपज देणाऱ्या जमिनीवर काम करणारे लोक त्याच्याकडे होते, कारण त्याला जमिनीची आवड होती.

  13. ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.

  14. तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी.

  15. नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे.

  16. सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते.

  17. तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे.

  18. त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.

  19. या बागेतील पाण्याचा झरा, लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्‍या वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस.

  20. तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल.

  21. त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.

  22. तुमच्या बाबत बोलायचे तर, रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे, मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे.

  23. तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.

  24. तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?”

  25. त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते.