Skip to content

Wells बद्दल बायबलमधील वचने

53 वचने · 43 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

  2. मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.

  3. “पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली.

  4. यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”

  5. म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.

  6. तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.

  7. पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत.

  8. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, त्या तरुणींपैकी एकीला ‘तुझी पाण्याची घागर वाकवून मला प्यायला पाणी दे’ असा ज्यावेळी मी म्हणेन त्यावेळी, ‘होय निश्चितच, मी तुझ्या उंटांनाही पाणी पाजते’ असे जी म्हणेल तीच इसहाकासाठी तुम्ही निवडलेली वधू आहे, यावरून मला समजेल की तुम्ही माझ्या धन्याला कृपा दाखविली आहे.”

  9. ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.

  10. त्यास पुरेसे पाणी पाजल्यानंतर ती त्याला म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीही त्यांना पुरेल इतके पाणी काढते.”

  11. तिने आपल्या घागरीतील पाणी कुंडात ओतले आणि ती पुन्हा पाणी काढण्याकरिता विहिरीकडे धावत गेली आणि त्याच्या सर्व उंटांना पुरेल इतके पाणी तिने काढले.

  12. “आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा.

  13. म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.

  14. इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.

  15. मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.

  16. मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह असे ठेवले.

  17. यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”

  18. त्याला समोरच्या मैदानात मेंढरांचे तीन कळप, एका विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले दिसले, परंतु एका मोठ्या दगडाने विहिरीचे तोंड झाकून ठेवलेले होते.

  19. सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.

  20. याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”

  21. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  22. तिथे एका मिद्यानी याजकाच्या सात मुली होत्या, त्या आपल्या पित्याच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी, व कुंडे भरून घेण्यासाठी विहिरीवर आल्या.

  23. पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले.

  24. मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

  25. कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.”