मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पुढे पश्चिमेकडे अझनोथ ताबोरमधून जाते आणि हुक्कोक येथे निघते. दक्षिणेकडून ती जबुलूनजवळ, पश्चिमेकडून आशेरजवळ आणि पूर्वेकडून यार्देनच्या यहूदीया वतनभागाला जाऊन मिळते.

  2. तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,

  3. अदमाह, रामाह, हासोर,

  4. केदेश, एद्रेई, एन-हासोर,

  5. इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.

  6. ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.

  7. नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.

  8. तिने नफतालीच्या प्रदेशातील केदेश येथे राहणारा अबीनोअमाचा पुत्र बाराकास बोलावून आणले आणि ती त्याला म्हणाली, “याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला आज्ञा देतात: ‘जा आणि तुझ्यासोबत नफताली आणि जबुलून वंशातील दहा हजार पुरुषांना सोबत घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा.

  9. बाराकाने जबुलूनी आणि नफतालीच्या लोकांना बोलाविले आणि तेव्हा दहा हजार पुरुष त्याच्यामागे निघाले. दबोराही त्याच्यासह केदेशला गेली.

  10. जबुलूनच्या लोकांनी आपल्या जीव धोक्यात घातला; तसेच नफतालीच्या लोकांनी रणभूमीवर मरणाचा धोका पत्करला.

  11. तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.

  12. अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);

  13. त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.

  14. बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.

  15. इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.

  16. नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक;

  17. जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;

  18. मनश्शेह, एफ्राईम आणि शिमओन या गोत्रांच्या नगरांमध्ये, नफतालीपर्यंत आणि त्यांच्या सभोवतालच्या भग्नावशेषांमध्ये,

  19. तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

  20. अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर प्रकाश उदय पावला आहे.

  21. नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम येथे गेले.

  22. या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:

  23. “जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत—