मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Bounds of their inheritance

8 वचने · 26 पैलू

Bounds of their inheritance बद्दल वचने

  1. सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली.

  2. ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते.

  3. पुढे पश्चिमेकडे अझनोथ ताबोरमधून जाते आणि हुक्कोक येथे निघते. दक्षिणेकडून ती जबुलूनजवळ, पश्चिमेकडून आशेरजवळ आणि पूर्वेकडून यार्देनच्या यहूदीया वतनभागाला जाऊन मिळते.

  4. तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,

  5. अदमाह, रामाह, हासोर,

  6. केदेश, एद्रेई, एन-हासोर,

  7. इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती. ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.

  8. ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.