मुख्य मजकुरावर जा

The Sea बद्दल बायबलमधील वचने

95 वचने · 55 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली,

  2. जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’?

  3. तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो.

  4. तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो; की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत.

  5. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

  6. तुम्ही महासागराच्या खवळलेल्या लाटांना शांत करता आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता.

  7. प्रभूने घोषणा केली, “बाशान येथून मी तुझे शत्रू पुन्हा आणेन; समुद्राच्या तळातून मी त्यांना पुन्हा वर आणेन,

  8. हे आकाशा, अगे पृथ्वी, हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,

  9. तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले, तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती; तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.

  10. त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला.

  11. भयानक उसळणार्‍या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.

  12. याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे.

  13. सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.

  14. समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.

  15. एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे.

  16. यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला.

  17. काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.

  18. त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.

  19. ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.

  20. त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.

  21. त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.

  22. याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर, सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील, त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.

  23. पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,

  24. त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,

  25. जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला,