मुख्य मजकुरावर जा

Ships बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 53 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.

  2. सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते; हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते.

  3. गबालचे अनुभवी वडील जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते. समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले.

  4. तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.

  5. जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.

  6. सर्व वल्हेकरी जहाज टाकून देतील; नावाडी आणि सर्व खलाशी किनार्‍यावर उभे राहतील.

  7. पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्‍यांवर कृपा दाखवेल.

  8. “अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्‍या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.

  9. परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.

  10. मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.

  11. सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता.

  12. तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”

  13. तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता.

  14. किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले,

  15. थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली.

  16. येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?”

  17. एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.

  18. त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते.

  19. येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”

  20. शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.”

  21. तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या.

  22. जे सहकारी दुसर्‍या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या.

  23. शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!”

  24. कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते;

  25. ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले.