Ships बद्दल बायबलमधील वचने: Were often wrecked
Were often wrecked बद्दल वचने
ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत.
पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला.
परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्या लाटांनी तुकडे तुकडे झाले.
तेव्हा कैदी पोहत जाऊन पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना ठार मारावे, अशी योजना सैनिकांनी केली.
परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.
त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्यावर सुरक्षितपणे पोहोचला.
तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला.