Skip to content

Sheep बद्दल बायबलमधील वचने

144 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.

  2. हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात आणि दर्‍यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते; ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते.

  3. आसाफाचे मासकील हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का? स्वतःच्या कुरणातील कळपावर तुमचा क्रोधाग्नी एवढा का भडकला आहे?

  4. पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले,

  5. मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली.

  6. मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

  7. परंतु गरजवंतांची ते पीडेतून सुटका करतात, आणि त्यांच्या कुटुंबाची कळपासारखी भरभराट करतात.

  8. पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.

  9. पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे, टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात?

  10. हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही.

  11. आमची अन्नभांडारे सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील, आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढतील.

  12. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.

  13. मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?

  14. तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत, प्रत्येकाला आपले जुळे आहेत; त्यापैकी कोणीही एकटे नाहीत.

  15. त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.

  16. आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.

  17. लांडगा कोकऱ्याबरोबर राहील, चित्ता बकरीबरोबर झोपेल, वासरे आणि सिंह एकत्र राहतील; आणि एक लहान बालक त्यांचे मार्गदर्शन करेल.

  18. परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे, गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या, मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे! तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत!”

  19. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला.

  20. त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

  21. केदारचे सर्व कळप तुला दिले जातील व नबायोथचे मेंढे तुला सेवेसाठी देण्यात येतील; ते माझ्या वेद्यांवर अर्पण म्हणून मान्य केले जातील, आणि मी माझे गौरवशाली मंदिर सुशोभित करेन.

  22. अपरिचित लोक तुमचे कळप राखतील; विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.

  23. माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.

  24. “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”

  25. मी त्यांना कोकरागत, मेंढ्या व बोकडागत कत्तल करण्यास खाली आणेन.