- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Sheep बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो.
माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो;
तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”
यहूद्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांच्यात पुन्हा मतभेद उत्पन्न झाले.
त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?”
तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?”
ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता.
आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते.
यहूदी पुढार्यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.”
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात,
परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत.
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?” पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.”
तिसर्या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार.
स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?
काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते.
आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,
तुमच्या देखरेखीखाली असलेल्या परमेश्वराच्या कळपाचे पालनपोषण करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्हाला हे काम करावेच लागते अशा दृष्टीने नाही तर तुम्ही स्वखुशीने हे काम करा, ही परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे; अप्रामाणिक लाभ मिळविण्यासाठी नाही परंतु सेवा करण्यास उत्सुक असा;