Sheep बद्दल बायबलमधील वचने: Offered in sacrifice under the law
Offered in sacrifice under the law बद्दल वचने
“ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.
“ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे.
राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचा आणि गुरांचा बळी दिले की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.
शलोमोनने शांत्यर्पणासाठी जी अर्पणे केली ती: बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे होती. याप्रकारे राजाने व सर्व इस्राएली लोकांनी याहवेहच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली.