Skip to content

Rivers बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 59 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नदीचे पाणी वाळून जाईल, आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.

  2. कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  3. तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  4. जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

  5. प्रचंड जलाशयावरून शिहोरचे धान्य आले; नाईल नदीकाठापासून कापणी केलेले पीक हे सोरचे उत्पन्न होते, आणि ती राष्ट्रांची बाजारपेठ झाली.

  6. तार्शीश मुली, नाईल नदीच्या काठाने तुमच्या जमिनीची मशागत करा, कारण आता तुमच्याकडे बंदर राहणार नाही.

  7. पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.

  8. मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.

  9. प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.

  10. तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.

  11. आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील. विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल. कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही, कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही.

  12. ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.

  13. जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.

  14. पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे! ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का? मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे ओसाड भूमीत झरे बनवित आहे.

  15. रानातील हिंस्र श्वापदे कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात, कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी, ओसाड भूमीत झरे बनवितो,

  16. मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

  17. कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल.

  18. आता इजिप्तकडे कशाला जाता नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? आणि अश्शूराकडे का जावे फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?

  19. ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

  20. याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.

  21. “यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

  22. म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी तुमची बाजू मांडेन मी तुमचा सूड उगवेन; मी तिचे समुद्र आटवून टाकेन आणि तिचे झरे शुष्क करेन.

  23. माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.

  24. बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.

  25. नंतर करूब वर उठले. हे तर तेच जिवंत प्राणी होते जे मी खेबर नदीकाठी पाहिले होते.