मुख्य मजकुरावर जा

Rivers बद्दल बायबलमधील वचने: (Overflowing of,) of God's judgments

5 वचने · 59 पैलू

(Overflowing of,) of God's judgments बद्दल वचने

  1. म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील,

  2. हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.”

  3. पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.

  4. मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द केला जाईल; अधोलोकाशी केलेला तुमचा करार टिकणार नाही. जेव्हा दुःखदायक अरिष्ट झाडून काढते, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून तुडविले जाईल.

  5. याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.