मुख्य मजकुरावर जा

Rivers बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 59 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत.

  2. त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.

  3. जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली.

  4. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते.

  5. आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”

  6. तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.

  7. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

  8. ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.

  9. ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.

  10. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा केला जात असे.

  11. त्यांच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना कृपेवर कृपा भरून मिळाली आहे.

  12. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

  13. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.

  14. मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली.