Skip to content

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल.

  2. ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्वीकार करा.

  3. कारण त्यामुळेच तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये आहात, ते परमेश्वरापासून आपले ज्ञान व नीतिमत्व, पवित्रता आणि खंडणी असे झाले आहेत.

  4. परंतु प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकरच येईन आणि त्यावेळी गर्विष्ठांच्या बोलण्याकडेच नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे देखील पाहीन.

  5. परमेश्वराचे राज्य बोलण्यात नव्हे परंतु सामर्थ्यात आहे.

  6. याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.

  7. जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्‍या झांजेसारखा आहे.

  8. मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.

  9. माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.

  10. प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.

  11. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.

  12. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते.

  13. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.

  14. भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.

  15. कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे.

  16. परंतु पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर, जे अपूर्ण आहे ते नाहीसे होईल.

  17. मी बालक होतो, तेव्हा माझे बोलणे, विचार करणे, विवाद करणे बालकासारखे होते. परंतु जेव्हा मी प्रौढ झालो, तेव्हा लेकरांसारखे वागणे मी सोडून दिले आहे.

  18. कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे.

  19. विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.

  20. तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.

  21. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.

  22. ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.

  23. सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो.

  24. विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय?

  25. कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते.