मुख्य मजकुरावर जा

Righteousness बद्दल बायबलमधील वचने

480 वचने · 132 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.

  2. हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.”

  3. कारण तो पेरणार्‍यांसाठी बी पुरवितो आणि खाण्यासाठी भाकर पुरवितो तोच तुम्हालाही पेरण्यासाठी बियांचा भांडार वाढवेल व पुरवठा करेल आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हंगामाची वाढ करेल.

  4. आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो.

  5. तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत?

  6. हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.

  7. मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”

  8. तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते.

  9. कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”

  10. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत.

  11. परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,

  12. सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.

  13. फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो!

  14. जो देहाकरीता पेरतो, त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो त्याला पवित्र आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

  15. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  16. आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

  17. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे,

  18. कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही.

  19. आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.

  20. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)

  21. म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.

  22. येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.

  23. पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,

  24. पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल.

  25. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे.