मुख्य मजकुरावर जा

Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने

759 वचने · 177 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशे व अहरोन मंडळीपुढून निघून सभामंडपाच्या दाराशी गेले व पालथे पडले आणि याहवेहचे तेज त्यांना प्रकट झाले.

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  3. “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”

  4. मोशेने आपली काठी याहवेहच्या उपस्थितीपुढून घेतली आणि जसे आज्ञापिले त्याप्रमाणेच त्याने केले.

  5. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?”

  6. मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.

  7. मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.

  8. आमचे पूर्वज खाली इजिप्तमध्ये गेले आणि पुष्कळ वर्षे आम्ही तिथे राहिलो. इजिप्तच्या लोकांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना अयोग्य वागणूक दिली,

  9. पण आम्ही जेव्हा याहवेहचा धावा केला, तेव्हा याहवेहने आमचे रडणे ऐकले, त्यांनी एक दूत पाठवून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. “आता आम्ही इथे तुझ्या सीमेवरील टोकावर, कादेश नगरात आहोत.

  10. कृपा करून आम्हाला तुझ्या देशातून जाऊ दे. आम्ही कोणत्याही शेतातून किंवा द्राक्षमळ्यातून जाणार नाही किंवा कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. तुझी सीमा ओलांडून जाईपर्यंत आम्ही राजमार्गावरच प्रवास करू.”

  11. पण एदोम म्हणाला: “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”

  12. इस्राएली लोकांनी उत्तर दिले: “आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.”

  13. त्यांनी पुन्हा उत्तर दिले: “तुम्ही जाऊ शकत नाही.” तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला.

  14. एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले.

  15. इस्राएली लोक अथारीमच्या वाटेने येत आहेत असे नेगेवमध्ये राहत असलेला कनानी राजा अरादने जेव्हा ऐकले, तेव्हा त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला व काहींना कैद केले.

  16. तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.”

  17. याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह असे पडले.

  18. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

  19. तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.”

  20. तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.

  21. नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे.

  22. यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: “…सूफाहतील वाहेब व आर्णोनाचे ओहोळ

  23. आणि ओहोळांचा जो ओघ आर येथील वस्तीकडे वाहतो आणि मोआब प्रदेशालगत आहे.”

  24. इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:

  25. “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”