Journey of Israel Through The Desert बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मोशे आणि अहरोन सभामंडपाच्या दाराशी येऊन उभे राहिले;
आणि याहवेह मोशेला म्हणाले,
“या लोकांपासून दूर व्हा म्हणजे मला त्यांचा क्षणात नाश करता येईल.” आणि ते जमिनीवर पालथे पडले.
नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”
मोशेने सांगितल्याप्रमाणे अहरोनाने केले. तो लोकांमध्ये पळत गेला, कारण पीडा त्यांच्यामध्ये सुरू झाली होती. त्याने धूप जाळले आणि लोकांसाठी प्रायश्चित्त केले.
मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली.
परंतु त्याअगोदरच 14,700 लोक मरण पावले होते. आदल्याच दिवशी कोरहाबरोबर मेलेल्या लोकांव्यतिरिक्त हे आणखी लोक मरण पावले होते.
यानंतर अहरोन मोशेकडे सभामंडपाच्या दाराशी परत आला, कारण पीडा थांबली होती.
याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांशी बोल व त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी अशा बारा काठ्या घे. प्रत्येक पुरुषाचे नाव त्याच्या काठीवर लिही.
लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्याची एक काठी असावी.
सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या.
ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”
म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती.
मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.
दुसर्या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.
मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्याने आपआपली काठी घेतली.
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.”
याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणेच मोशेने केले.
इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत!
जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?”
त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.
लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!
याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?
इजिप्त देशाबाहेर या भयंकर ठिकाणी तुम्ही आम्हाला का आणले? या ठिकाणी ना धान्य किंवा अंजीर ना द्राक्षवेल किंवा डाळिंबे आहेत आणि प्यायला पाणीही नाही!”