- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Assyria बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते.
तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास, गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!
तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम उंचीवर पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.
अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या आणि तेथील पाणी प्यालो. माझ्या पावलाच्या तळव्याने मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’
“हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास.
त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, ते निराश व लज्जित झालेले आहेत. ते शेतातील पिकासारखे, कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, छतावर उगविलेल्या गवतासारखे, पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते.
“परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस.
कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.
“हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.
पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल.
यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल.
“म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.
ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.
“माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!”
तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले.
इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या.
“म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले.
त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला.
“तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती.
ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते.
मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या.
“परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,
त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्यांसारखे, खास्द्यांचे रहिवासी असे दिसत होते.
ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले.
मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले.