मुख्य मजकुरावर जा

Assyria बद्दल बायबलमधील वचने: The Jews condemned for following the idolatries of

43 वचने · 59 पैलू

The Jews condemned for following the idolatries of बद्दल वचने

  1. तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले.

  2. इजिप्तमध्ये सुरू केलेली वेश्यावृत्ती तिने सोडली नाही, जिथे पुरुष तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर झोपले तिच्या कुमारावस्थेतील छाती त्यांनी कुरवाळली आणि त्यांच्या वासना तिच्यावर ओतल्या.

  3. “म्हणून मी तिला तिचे अश्शूरी प्रियकर, ज्यांची अभिलाषा तिने बाळगली त्यांच्या हाती दिले.

  4. त्यांनी तिला नग्न केले, तिची मुले व मुली घेऊन तिला तलवारीने मारून टाकले. स्त्रियांमध्ये ती म्हणीप्रमाणे झाली आणि तिला दंड देण्यात आला.

  5. “तिची बहीण ओहोलीबाहने हे पाहिले, तरीही तिच्या वासना व वेश्यावृत्तीत ती तिच्या बहिणीपेक्षा अधिक व ती दुर्गुणी होती.

  6. ती अश्शूरी लोकांच्या मागे वासनेने आसक्त झाली—राज्यपाल आणि सेनापती, गणवेष घातलेले योद्धे, घोडेस्वार आणि सर्व देखणे पुरुष होते.

  7. मी पाहिले की तिने सुद्धा स्वतःला अपवित्र केले; त्या दोघीही एकाच मार्गाने गेल्या.

  8. “परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,

  9. त्यांच्या कंबरेला पट्टे होते व त्यांच्या डोक्यावर सुंदर फेटे होते; ते सर्व बाबेलच्या रथ अधिकार्‍यांसारखे, खास्द्यांचे रहिवासी असे दिसत होते.

  10. ती चित्रे पाहताच त्यांची वासना तिला झाली आणि खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे दूत पाठवले.

  11. मग बाबेलचे लोक तिच्याकडे प्रेमाच्या पलंगावर आले, आणि त्यांच्या वासनांनी तिला भ्रष्ट केले, तेव्हा तिने तिचे मन त्यांच्यापासून घृणेने वळविले.

  12. जेव्हा उघडपणे तिने तिची वेश्यावृत्ती केली आणि तिचे नग्न शरीर उघडे केले, तेव्हा जसे मी तिच्या बहिणीपासून झालो तसाच तिरस्काराने मी तिच्यापासून दूर झालो.

  13. तरीही तारुण्याच्या दिवसांत इजिप्तमध्ये वेश्या होती त्या दिवसांची आठवण करीत ती अजूनच स्वैराचाराने वागू लागली.

  14. तिथे ती वेश्या तिच्या प्रियकरांची वासना करू लागली, ज्यांचे जननेंद्रिय गाढवांप्रमाणे व त्यांचा स्त्राव घोड्यांसारखा होता.

  15. याप्रकारे जेव्हा इजिप्तमध्ये तुझ्या छातीला कुरवाळले गेले व तुझे तरुण स्तन हाताळले गेले, त्या तुझ्या तारुण्यातील अश्लीलतेची अभिलाषा तू धरलीस.

  16. “म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन;

  17. बाबेल व खास्द्यांचे लोक, पकोड, शोआ व कोआतील पुरुष आणि त्यांच्यासह सर्व अश्शूरी, सुंदर तरुण पुरुष, त्यांचे राज्यपाल आणि सरदार, रथ अधिकारी, उच्च पदाधिकारी व घोडेस्वार.

  18. हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील.

  19. मी आपला ईर्षायुक्त क्रोध तुझ्यावर आणेन आणि संतापाने ते तुझ्याशी वागतील. ते तुझे नाक व कान कापतील आणि तुझ्यातील मागे राहिलेले ते तलवारीने पडतील आणि त्यातूनही जे वाचतील ते अग्नीने भस्म होतील.

  20. ते तुझी वस्त्रे काढून घेतील व तुझे दागिने हिसकावून घेतील.

  21. म्हणजे जी अश्लीलता व वेश्यावृत्ती तू इजिप्तमध्ये चालू केली तिचा शेवट मी करेन. या गोष्टींकडे तू पुन्हा पाहणार नाहीस आणि यापुढे इजिप्तचे स्मरण आणखी करणार नाहीस.

  22. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्यांचा तू द्वेष करतेस, तिरस्काराने ज्यांच्यापासून तू दूर झालीस त्यांच्या हाती मी तुला देत आहे.

  23. ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल.

  24. तुझी अश्लीलता व दुराचारांनी हे सर्व तू तुझ्यावर ओढवून घेतले आहे, कारण तू राष्ट्रांची अभिलाषा धरलीस आणि त्यांच्या मूर्तींनी स्वतःला विटाळून टाकले.

  25. तू आपल्या बहिणीच्या मार्गाने गेलीस; म्हणून तिचा पेला मी तुझ्या हाती देईन.