Assyria बद्दल बायबलमधील वचने: Prophecies concerning
Prophecies concerning बद्दल वचने
एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”
त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.
ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील.
त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.
त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.
आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.
त्या दिवशी, ज्या प्रत्येक ठिकाणी एक हजार द्राक्षवेली होत्या ज्याची किंमत एक हजार चांदीचे शेकेल होते त्या ठिकाणी तिथे फक्त काटेरी झुडपे आणि कुसळे असतील.
शिकारी धनुष्य आणि बाण घेऊन तिथे जातील, कारण तेथील जमीन काटेरी झुडूपांनी आणि कुसळांनी झाकलेली असेल.
एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.
कारण त्या मुलाला ‘माझे वडील’ किंवा ‘माझी आई’ कसे म्हणायचे हे समजून येण्याआधीच दिमिष्कची संपत्ती आणि शोमरोनची लूट अश्शूरच्या राजाकडून नेली जाईल.”
याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले:
“कारण या लोकांनी हळूवारपणे वाहणारे शिलोहचे पाणी नाकारले आहे आणि रसीन आणि रमाल्याहच्या पुत्राबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील,
हे इम्मानुएला! तो महाप्रलय यहूदीयावरही चढेल, तिच्यावरून गरगर फिरेल, तिच्यामधून जाईल आणि तिच्या गळ्यापर्यंत पोहोचेल. त्याचे पसरलेले पंख तुमच्या देशाचा विस्तार झाकून टाकतील.”
युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!
तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.
“अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!
मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.
परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.
‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?
जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—
शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”
जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.