Skip to content

Armies बद्दल बायबलमधील वचने

207 वचने · 77 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.

  2. तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.

  3. आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको.

  4. अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे,

  5. “चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.”

  6. तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही,

  7. कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.

  8. एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”

  9. युद्धाची रणगर्जना करा, हे देशांनो, तुम्ही मोडून जाल! दूर राहणाऱ्या लोकांनो ऐका, युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा! युद्धासाठी सज्ज व्हा आणि विखरून जा!

  10. तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.

  11. याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस:

  12. “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका.

  13. स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

  14. आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.

  15. तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.

  16. तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.

  17. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.

  18. तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.

  19. मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”

  20. शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’

  21. “यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?

  22. उत्तरेकडील तुझ्या स्थानातून तू येशील, तू आणि तुझ्याबरोबर पुष्कळ राष्ट्रे, त्यातील प्रत्येक घोड्यावर स्वार असलेले, मोठे दळ, मोठे सैन्य असेल.

  23. मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.

  24. तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.

  25. त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले.