मुख्य मजकुरावर जा

Armies बद्दल बायबलमधील वचने

207 वचने · 77 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.

  2. नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?”

  3. त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव.

  4. पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.”

  5. म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले.

  6. दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर पुढे जाण्यास घोडदळाला त्याच्याबरोबर ठेऊन ते आपल्या बराकीत परतले.

  7. ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले.