Skip to content

Armies बद्दल बायबलमधील वचने: Standing armies

13 वचने · 77 पैलू

Standing armies बद्दल वचने

  1. यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली

  2. आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले.

  3. कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती: यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती: अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती;

  4. त्यानंतर यहोहानान हा 2,80,000 सैनिकांवर सेनापती;

  5. त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते.

  6. बिन्यामीनकडून: एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्‍यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष;

  7. त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष.

  8. या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले.

  9. उज्जीयाहकडे एक प्रशिक्षित सैन्य होते, हनन्याह हा राजेशाही अधिकाऱ्यांपैकी एक होता, याच्या मार्गदर्शनाखाली सचिव ईयेल आणि मासेयाह या अधिकाऱ्याने जमविलेल्या संख्येनुसार विभाग करून ते युद्ध करण्यास सुसज्जित होते.

  10. योद्धे पुरुषांच्या कुटुंब प्रमुखांची एकूण संख्या 2,600 होती.

  11. त्यांच्या नेतृत्वाखाली युद्धासाठी प्रशिक्षित झालेल्या पुरुषांचे सैन्य 3,07,500 होते, राजाला त्याच्या शत्रूविरुद्ध आधार देण्यासाठी ते एक शक्तिशाली सैन्य होते.

  12. उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला.

  13. यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.