मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित ७:५८सुमारे इ.स. ३३

    त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते.

  2. प्रेषित ७:५९सुमारे इ.स. ३३

    ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”

  3. प्रेषित ७:६०सुमारे इ.स. ३३

    आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.

  4. प्रेषित ८:१सुमारे इ.स. ३४

    स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.

  5. प्रेषित ८:२सुमारे इ.स. ३४

    भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला

  6. प्रेषित ८:३सुमारे इ.स. ३४

    परंतु शौलाने मंडळीचा नाश करण्यास सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन, स्त्री व पुरुष दोघांनाही खेचून तुरुंगात घालीत असे.

  7. प्रेषित ८:४सुमारे इ.स. ३४

    आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला.

  8. प्रेषित ८:५सुमारे इ.स. ३४

    फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली.

  9. प्रेषित ८:६सुमारे इ.स. ३४

    ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.

  10. प्रेषित ८:७सुमारे इ.स. ३४

    अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत.

  11. प्रेषित ८:८सुमारे इ.स. ३४

    त्या शहरात मोठा आनंद झाला होता.

  12. प्रेषित ८:९सुमारे इ.स. ३४

    आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे.

  13. प्रेषित ८:१०सुमारे इ.स. ३४

    म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.

  14. प्रेषित ८:११सुमारे इ.स. ३४

    ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते.

  15. प्रेषित ८:१२सुमारे इ.स. ३४

    परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.

  16. प्रेषित ८:१३सुमारे इ.स. ३४

    शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला.

  17. प्रेषित ८:१४सुमारे इ.स. ३४

    यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.

  18. प्रेषित ८:१५सुमारे इ.स. ३४

    ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्‍यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली,

  19. प्रेषित ८:१६सुमारे इ.स. ३४

    कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.

  20. प्रेषित ८:१७सुमारे इ.स. ३४

    मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.

  21. प्रेषित ८:१८सुमारे इ.स. ३४

    शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले

  22. प्रेषित ८:१९सुमारे इ.स. ३४

    आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.”

  23. प्रेषित ८:२०सुमारे इ.स. ३४

    पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!

  24. प्रेषित ८:२१सुमारे इ.स. ३४

    या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.

  25. प्रेषित ८:२२सुमारे इ.स. ३४

    तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील;