मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित ७:३३सुमारे इ.स. ३३

    “मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.

  2. प्रेषित ७:३४सुमारे इ.स. ३३

    इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’

  3. प्रेषित ७:३५सुमारे इ.स. ३३

    “त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश असे कोणी नेमले?’ असे विचारून पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले.

  4. प्रेषित ७:३६सुमारे इ.स. ३३

    आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले.

  5. प्रेषित ७:३७सुमारे इ.स. ३३

    “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’

  6. प्रेषित ७:३८सुमारे इ.स. ३३

    तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.

  7. प्रेषित ७:३९सुमारे इ.स. ३३

    “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.

  8. प्रेषित ७:४०सुमारे इ.स. ३३

    त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव—ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही!’

  9. प्रेषित ७:४१सुमारे इ.स. ३३

    त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले.

  10. प्रेषित ७:४२सुमारे इ.स. ३३

    म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे: “ ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय?

  11. प्रेषित ७:४३सुमारे इ.स. ३३

    तुम्ही मोलेख दैवताचा मंडप आणि शक्कुथ व तार्‍यांचे दैवत रेफान, उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’

  12. प्रेषित ७:४४सुमारे इ.स. ३३

    “आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती.

  13. प्रेषित ७:४५सुमारे इ.स. ३३

    जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला.

  14. प्रेषित ७:४६सुमारे इ.स. ३३

    दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली.

  15. प्रेषित ७:४७सुमारे इ.स. ३३

    परंतु तो शलोमोन होता ज्याने परमेश्वरासाठी भवन बांधले.

  16. प्रेषित ७:४८सुमारे इ.स. ३३

    “तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो:

  17. प्रेषित ७:४९सुमारे इ.स. ३३

    “ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतात. माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?

  18. प्रेषित ७:५०सुमारे इ.स. ३३

    माझ्या हाताने हे सर्व घडवले नाही काय?’

  19. प्रेषित ७:५१सुमारे इ.स. ३३

    “अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता!

  20. प्रेषित ७:५२सुमारे इ.स. ३३

    तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्‍यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले

  21. प्रेषित ७:५३सुमारे इ.स. ३३

    आणि देवदूतांद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.”

  22. प्रेषित ७:५४सुमारे इ.स. ३३

    सभागृहातील यहूदी पुढार्‍यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले.

  23. प्रेषित ७:५५सुमारे इ.स. ३३

    परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले.

  24. प्रेषित ७:५६सुमारे इ.स. ३३

    तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.”

  25. प्रेषित ७:५७सुमारे इ.स. ३३

    मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले,