- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित ८:२३सुमारे इ.स. ३४
कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.”
- प्रेषित ८:२४सुमारे इ.स. ३४
तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”
- प्रेषित ८:२५सुमारे इ.स. ३४
आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली.
- प्रेषित ८:२६सुमारे इ.स. ३४
आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.”
- प्रेषित ८:२७सुमारे इ.स. ३४
तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता,
- प्रेषित ८:२८सुमारे इ.स. ३४
आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.
- प्रेषित ८:२९सुमारे इ.स. ३४
तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”
- प्रेषित ८:३०सुमारे इ.स. ३४
मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?”
- प्रेषित ८:३१सुमारे इ.स. ३४
तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.
- प्रेषित ८:३२सुमारे इ.स. ३४
शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
- प्रेषित ८:३३सुमारे इ.स. ३४
त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”
- प्रेषित ८:३४सुमारे इ.स. ३४
षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
- प्रेषित ८:३५सुमारे इ.स. ३४
तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.
- प्रेषित ८:३६सुमारे इ.स. ३४
तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?”
- प्रेषित ८:३७सुमारे इ.स. ३४
फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”
- प्रेषित ८:३८सुमारे इ.स. ३४
मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.
- प्रेषित ८:३९सुमारे इ.स. ३४
ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला.
- प्रेषित ८:४०सुमारे इ.स. ३४
फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.
- प्रेषित ९:१सुमारे इ.स. ३५
इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला
- प्रेषित ९:२सुमारे इ.स. ३५
आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे.
- प्रेषित ९:३सुमारे इ.स. ३५
तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला.
- प्रेषित ९:४सुमारे इ.स. ३५
तो जमिनीवर पडला आणि त्याच्याशी बोलणारी एक वाणी त्याने ऐकली, ती म्हणाली, “शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस?”
- प्रेषित ९:५सुमारे इ.स. ३५
शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे,
- प्रेषित ९:६सुमारे इ.स. ३५
तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”
- प्रेषित ९:७सुमारे इ.स. ३५
शौलाच्या बरोबर प्रवास करणारे निःशब्द होऊन उभे राहिले; त्यांनी आवाज ऐकला खरा, परंतु त्यांनी कोणाला पाहिले नाही