मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित ९:३३सुमारे इ.स. ३५

    तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता.

  2. प्रेषित ९:३४सुमारे इ.स. ३५

    पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला.

  3. प्रेषित ९:३५सुमारे इ.स. ३५

    लोद व शारोन या शहरात राहणार्‍या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले.

  4. प्रेषित ९:३६सुमारे इ.स. ३५

    आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे.

  5. प्रेषित ९:३७सुमारे इ.स. ३५

    याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता.

  6. प्रेषित ९:३८सुमारे इ.स. ३५

    लोद योप्पाच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली.

  7. प्रेषित ९:३९सुमारे इ.स. ३५

    पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली.

  8. प्रेषित ९:४०सुमारे इ.स. ३५

    पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली.

  9. प्रेषित ९:४१सुमारे इ.स. ३५

    त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्‍यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत सादर केले.

  10. प्रेषित ९:४२सुमारे इ.स. ३५

    ही घटना योप्पामध्ये समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.

  11. प्रेषित ९:४३सुमारे इ.स. ३५

    पेत्र योप्पा येथे शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी बरेच दिवस राहिला.

  12. प्रेषित १०:१सुमारे इ.स. ४१

    कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता.

  13. प्रेषित १०:२सुमारे इ.स. ४१

    तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे.

  14. प्रेषित १०:३सुमारे इ.स. ४१

    एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

  15. प्रेषित १०:४सुमारे इ.स. ४१

    कर्नेल्याने त्याच्याकडे टक लावून पाहिले व भयभीत झाला. त्याने विचारले, “काय प्रभूजी?” देवदूत उत्तरला, “तुझ्या प्रार्थना आणि गरिबांसाठी केलेल्या दानधर्माची परमेश्वराला आठवण आहे.

  16. प्रेषित १०:५सुमारे इ.स. ४१

    आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे.

  17. प्रेषित १०:६सुमारे इ.स. ४१

    ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.”

  18. प्रेषित १०:७सुमारे इ.स. ४१

    जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले.

  19. प्रेषित १०:८सुमारे इ.स. ४१

    घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले.

  20. प्रेषित १०:९सुमारे इ.स. ४१

    दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला.

  21. प्रेषित १०:१०सुमारे इ.स. ४१

    त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले.

  22. प्रेषित १०:११सुमारे इ.स. ४१

    त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे.

  23. प्रेषित १०:१२सुमारे इ.स. ४१

    तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती.

  24. प्रेषित १०:१३सुमारे इ.स. ४१

    मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.”

  25. प्रेषित १०:१४सुमारे इ.स. ४१

    “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.”