- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम ४:७सुमारे इ.स.पू. १४९१
“आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला.
- निर्गम ४:८सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील.
- निर्गम ४:९सुमारे इ.स.पू. १४९१
पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.”
- निर्गम ४:१०सुमारे इ.स.पू. १४९१
मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.”
- निर्गम ४:११सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?
- निर्गम ४:१२सुमारे इ.स.पू. १४९१
आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”
- निर्गम ४:१३सुमारे इ.स.पू. १४९१
पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्या कोणाला पाठवा.”
- निर्गम ४:१४सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मोशेविरुद्ध याहवेहचा राग भडकला, ते म्हणाले, “लेवी अहरोन, तुझा भाऊ, याच्याविषयी काय? मला ठाऊक आहे की तो चांगले बोलू शकतो. तो तुला भेटावे म्हणून मार्गावर आहे, तुला पाहून त्याला फार आनंद होईल.
- निर्गम ४:१५सुमारे इ.स.पू. १४९१
तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन.
- निर्गम ४:१६सुमारे इ.स.पू. १४९१
तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन.
- निर्गम ४:१७सुमारे इ.स.पू. १४९१
परंतु ही काठी आपल्या हातात घे, म्हणजे तिच्यायोगे तुला चिन्हे करता येतील.”
- निर्गम ४:१८सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशे आपला सासरा इथ्रोकडे गेला आणि त्याला म्हणाला, “इजिप्त देशात असलेल्या माझ्या स्वकियांकडे परत जाऊन त्यातील कोणी जिवंत आहेत की नाही ते मला पाहू दे.” इथ्रोने उत्तर दिले, “जा. तुझे भले होवो.”
- निर्गम ४:१९सुमारे इ.स.पू. १४९१
मिद्यानात याहवेहने मोशेला म्हटले, “इजिप्त देशास जा, कारण तुला ठार करावयास जे टपलेले होते, ते सर्व आता मरण पावले आहेत.”
- निर्गम ४:२०सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मोशे आपली पत्नी व मुले यांना गाढवावर बसवून इजिप्तला परतला. त्याने आपल्या हाती परमेश्वराची काठी घेतली.
- निर्गम ४:२१सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात पोहोचल्यावर फारोहसमोर जाऊन, मी जे चमत्कार करण्याचे सामर्थ्य तुला दिले आहे, ते त्याच्यापुढे सादर कर. पण मी फारोहचे हृदय कठीण करेन आणि तो लोकांना जाऊ देणार नाही.
- निर्गम ४:२२सुमारे इ.स.पू. १४९१
मग तू फारोहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल माझा ज्येष्ठपुत्र आहे,
- निर्गम ४:२३सुमारे इ.स.पू. १४९१
आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे, माझ्या पुत्राला माझी आराधना करण्यासाठी तू जाऊ द्यावेस. पण तू त्यांना पाठविण्यास नकार दिला; तर मी तुझा ज्येष्ठपुत्र मारून टाकीन.’ ”
- निर्गम ४:२४सुमारे इ.स.पू. १४९१
मोशे आपल्या मार्गात एके ठिकाणी मुक्कामास असताना, जसे याहवेह त्याला मारणारच असे गाठले.
- निर्गम ४:२५सुमारे इ.स.पू. १४९१
सिप्पोराहने एक धारदार गारेचा तुकडा घेऊन, आपल्या मुलाची अग्रत्वचा कापून त्याची सुंता केली व त्या अग्रत्वचेने तिने मोशेच्या पायांस स्पर्श केला आणि ती त्याला म्हणाली, “खरोखर तुम्ही माझे रक्ताचे वर आहात.”
- निर्गम ४:२६सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर याहवेहने त्याला सोडले. (“रक्ताचा वर” असे तिने सुंतेच्या बाबतीत म्हटले.)
- निर्गम ४:२७सुमारे इ.स.पू. १४९१
आता याहवेहने अहरोनाला म्हटले, “मोशेला भेटण्यासाठी रानात जा.” तेव्हा अहरोन मोशेला परमेश्वराच्या पर्वतावर भेटला आणि त्याचे चुंबन घेतले.
- निर्गम ४:२८सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा याहवेहने जे काही सांगावयास त्याला पाठविले होते ते सर्व मोशेने अहरोनाला सांगितले आणि जी चिन्हे करावयास सांगितली आहेत, त्याविषयी सुद्धा त्याला सांगितले.
- निर्गम ४:२९सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशे व अहरोन यांनी इस्राएलांच्या सर्व वडिलांना एकत्र बोलाविले,
- निर्गम ४:३०सुमारे इ.स.पू. १४९१
आणि याहवेहने मोशेला जे सांगितले होते ते सर्वकाही अहरोनाने त्यांना सांगितले. मोशेने लोकांच्या देखत चिन्हे करून दाखविली.
- निर्गम ४:३१सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा या गोष्टीवर त्यांनी विश्वास केला. आणि जेव्हा त्यांनी हे ऐकले की याहवेहने इस्राएली लोकांची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे, तेव्हा सर्वांनी नमन करून उपासना केली.