- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम ६:३सुमारे इ.स.पू. १४९१
मी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती.
- निर्गम ६:४सुमारे इ.स.पू. १४९१
ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.
- निर्गम ६:५सुमारे इ.स.पू. १४९१
आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.
- निर्गम ६:६सुमारे इ.स.पू. १४९१
म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन.
- निर्गम ६:७सुमारे इ.स.पू. १४९१
मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे.
- निर्गम ६:८सुमारे इ.स.पू. १४९१
आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”
- निर्गम ६:९सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही.
- निर्गम ६:१०सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले,
- निर्गम ६:११सुमारे इ.स.पू. १४९१
“जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”
- निर्गम ६:१२सुमारे इ.स.पू. १४९१
परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”
- निर्गम ६:१३सुमारे इ.स.पू. १४९१
आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
- निर्गम ६:१४सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही: इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र: हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.
- निर्गम ६:१५सुमारे इ.स.पू. १४९१
शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल.
- निर्गम ६:१६सुमारे इ.स.पू. १४९१
लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
- निर्गम ६:१७सुमारे इ.स.पू. १४९१
गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही: लिब्नी व शिमी.
- निर्गम ६:१८सुमारे इ.स.पू. १४९१
कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)
- निर्गम ६:१९सुमारे इ.स.पू. १४९१
मरारीच्या पुत्रांची नावे: महली व मूशी.
- निर्गम ६:२०सुमारे इ.स.पू. १४९१
अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले.
- निर्गम ६:२१सुमारे इ.स.पू. १४९१
इसहाराच्या पुत्रांची नावे: कोरह, नेफेग व जिक्री.
- निर्गम ६:२२सुमारे इ.स.पू. १४९१
उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
- निर्गम ६:२३सुमारे इ.स.पू. १४९१
अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.
- निर्गम ६:२४सुमारे इ.स.पू. १४९१
कोरहाच्या पुत्रांची नावे: अस्सीर, एलकानाह व अबीयासाफ.
- निर्गम ६:२५सुमारे इ.स.पू. १४९१
अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला.
- निर्गम ६:२६सुमारे इ.स.पू. १४९१
ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.”
- निर्गम ६:२७सुमारे इ.स.पू. १४९१
हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.