मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Moses & The Exodus

God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.

415 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. निर्गम ७:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला.

  2. निर्गम ७:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्‍यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते.

  3. निर्गम ७:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने नाईलवर प्रहार करून सात दिवस लोटले.

  4. निर्गम ८:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.

  5. निर्गम ८:२सुमारे इ.स.पू. १४९१

    तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन.

  6. निर्गम ८:३सुमारे इ.स.पू. १४९१

    नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.

  7. निर्गम ८:४सुमारे इ.स.पू. १४९१

    बेडूक तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर आणि तुझ्या सर्व अधिकार्‍यांवर येतील.”

  8. निर्गम ८:५सुमारे इ.स.पू. १४९१

    यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, त्याने त्याच्या हातात काठी घेऊन आपला हात इजिप्तमधील सर्व ओढे, कालव्याच्या व तलावाच्या दिशेला लांब करावा म्हणजे इजिप्त देशाच्या भूमीवर बेडूक येतील.”

  9. निर्गम ८:६सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला.

  10. निर्गम ८:७सुमारे इ.स.पू. १४९१

    पण जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने तसेच केले व इजिप्त देशात बेडूक आणले.

  11. निर्गम ८:८सुमारे इ.स.पू. १४९१

    मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून सांगितले, “याहवेहकडे प्रार्थना करा की त्यांनी माझ्यापासून व माझ्या लोकांपासून बेडूक दूर करावेत, मग मी तुझ्या लोकांनी याहवेहला यज्ञ करावा म्हणून त्यांना जाऊ देईन.”

  12. निर्गम ८:९सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशे फारोहला म्हणाला, “हा सन्मान मी तुला देतो, की मी तुझ्यासाठी, तुझ्या अधिकार्‍यांसाठी व लोकांसाठी विनंती करावी अशी वेळ तू नेमून ठेवावी, म्हणजे तुमच्यातून बेडूक नाहीसे होतील, नाईल नदीतील बेडके मात्र राहतील.”

  13. निर्गम ८:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.” मोशेने उत्तर दिले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, अशासाठी की तू जाणावे की याहवेह आमचे परमेश्वर यासारखे इतर कोणीही नाही.

  14. निर्गम ८:११सुमारे इ.स.पू. १४९१

    नाईल नदीतील बेडूक सोडून बाकीचे सर्व बेडूक तू, तुझे घर, तुझे सेवक व तुझ्या लोकांपासून निघून जातील.”

  15. निर्गम ८:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे व अहरोन फारोहला सोडून गेल्यानंतर, जी बेडके याहवेहने फारोहवर आणली होती, त्याविषयी मोशेने याहवेहला विनंती केली.

  16. निर्गम ८:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशेने मागितल्याप्रमाणे याहवेहने केले; आणि घरातील, अंगणातील व शेतातील सर्व बेडूक मरून गेले.

  17. निर्गम ८:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांचे ढीग जमा झाले, व देशात त्यांची दुर्गंधी पसरली.

  18. निर्गम ८:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही.

  19. निर्गम ८:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.”

  20. निर्गम ८:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांनी तसे केले, आणि जेव्हा अहरोनाने काठी घेऊन आपला हात लांब केला आणि भूमीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्य व जनावरे यावर चिलटे आली. इजिप्त देशभरातील सगळी धूळ चिलटे अशी झाली.

  21. निर्गम ८:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु जेव्हा जादूगारांनी आपल्या गुप्तज्ञानाने तसेच करण्याचा प्रयत्न केला, ते करू शकले नाही. कारण सगळीकडे लोकांवर व जनावरांवर चिलटे आली होती,

  22. निर्गम ८:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा ते जादूगार फारोहला म्हणाले, “ही परमेश्वराची अंगुली आहे.” पण याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहचे हृदय कठीण होते आणि त्याने त्यांचे ऐकले नाही.

  23. निर्गम ८:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    यानंतर याहवेह मोशेला म्हणाले, “पहाटे ऊठ व फारोह नदीवर जात असता त्याची भेट घे आणि त्याला सांग याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.

  24. निर्गम ८:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझ्यावर आणि तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर व तुमच्या घरांमध्ये गोमाश्यांचे थवे पाठवेन. इजिप्त लोकांची घरे गोमाश्यांनी भरून जातील; व जमीन सुद्धा गोमाश्यांनी झाकली जाईल.

  25. निर्गम ८:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    “पण त्या दिवशी माझे लोक राहतात त्या गोशेन प्रांताशी मी वेगळा वागेन; त्या ठिकाणी मात्र गोमाश्यांचे थवे नसतील, यावरून तुला समजावे की, मी याहवेह या भूमीवर आहे.