मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Moses & The Exodus

God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.

415 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. निर्गम ९:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.

  2. निर्गम ९:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस.

  3. निर्गम ९:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन.

  4. निर्गम ९:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”

  5. निर्गम ९:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    फारोहच्या ज्या अधिकार्‍यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.

  6. निर्गम ९:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.

  7. निर्गम ९:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.”

  8. निर्गम ९:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

  9. निर्गम ९:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.

  10. निर्गम ९:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले.

  11. निर्गम ९:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.

  12. निर्गम ९:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो.

  13. निर्गम ९:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”

  14. निर्गम ९:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे.

  15. निर्गम ९:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.”

  16. निर्गम ९:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    (आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती.

  17. निर्गम ९:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)

  18. निर्गम ९:३३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.

  19. निर्गम ९:३४सुमारे इ.स.पू. १४९१

    पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले.

  20. निर्गम ९:३५सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते.

  21. निर्गम १०:१सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे

  22. निर्गम १०:२सुमारे इ.स.पू. १४९१

    व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.”

  23. निर्गम १०:३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील.

  24. निर्गम १०:४सुमारे इ.स.पू. १४९१

    तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन.

  25. निर्गम १०:५सुमारे इ.स.पू. १४९१

    ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील.